अर्धापूर :पोलीस प्रशासन व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

0 20
अर्धापूर ता 30 (बातमीदार ): 26/11   मुंबईत झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहिंद झालेल्या विर जवाणांच्या स्मृती प्रित्येर्थ पोलीस प्रशासन व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद शुक्रवारी  (ता 30) मिळाला. पोलीस कर्मचारी व अधिकारी, पत्रकार व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषोधोपचार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अर्धापूर व पोलीस ठाणे अर्धापूर यांच्या संयुक्त सहकार्यातून मुंबईत झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहिद झालेल्या विर जवाणांच्या स्मृती प्रित्यर्थ आरोग्य व रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुजित नरहरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरक्षक त्र्यंबक गायकवाड, दिगांबर जामोदकर,प्रतिभा शाटे डॉ शेख मुजाहेद, डाॅ आनंद शिंदे, सेवानीवृत्त वैद्यकीय आधिकारी डॉ उत्तम इंगळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर, माजी नगराध्यक्षा रेखा काकडे,सुधाकर कदम, प्रवीण देशमुख,  सुनिल शिंदे, तुकाराम साखरे, नामदेव सरोदे, शिवराज जाधव, युसुफ पठान ,लक्ष्मीकांत मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहिद जिवांना आभिवादन करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहूण्यांचे स्वागत पोलीस व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना तहसीलदार सुजित नरहरे म्हणालेकी, शहिद जवांनच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान करणे हा स्तुत्य उपकृम असून संकटात सापडलेल्या गरजु रूग्णांना मदत होते. पत्रकार संघ व पोलीस एकत्र ऐऊन एका चांगला समाजऊपयोगी उपकृम राबविला आहे.जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे आसे आहवान सुजित नरहरे यांनी केले.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामराव भालेराव यांनी केले.  प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे आध्यक्ष नागोराव भांगे पाटील यांनी केले तर आभार छगन इंगळे यांनी केले.या वेळी तहसीलदार सुजित नरहरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर, राजु बारसे, रमाकांत हिवराळे, शेख शकील, नागोराव भांगे यांच्यासह असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख साबेर, विद्यासागर वैद्य, परमेश्वर कदम, हेमंत देशपांडे, किशोर पाटील, अब्दुल बुखारी,इरफाण पठान, ,शेख जुबेर, गुणवंत विरकर, उध्दव सरोदे, सय्यद युनुस,युनुस नदाफ, देवराव कांबळे, प्रफुल्ल मोटारवार,शेख मौला,दिगांबर मोळके,गोविंद टेकाळे यांनी पुढाकार घेतला. यावेळी लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, नगरसेवक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते